Wednesday 6 December 2017

राज्यस्तरीय दंत चिकित्सा परिषद; पिंपरीत आयोजन

पिंपरी- महाराष्ट्र राज्य डेन्टल असोशिएशनच्या वतीने 56 वी राज्यस्तरीय परिषद पिंपरी-चिंचवडमध्ये 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व ऑटो क्‍लस्टरमध्ये होणार आहे.
या परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि.8) सायंकाळी 6 वाजता पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचे हस्ते होणार आहे. यावेळी इंडियन डेन्टल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्‍वास पुराणिक, राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, डॉ. माऊली फरांदे, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. प्रमोद वाघमारे, डॉ. मनिषा गरुड, डॉ. यशवंत इंगळे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दंत विद्यार्थी परिषदेसाठी अभिनेते तुषार कपुर, अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment