Wednesday 6 December 2017

…अन्‌ मुळा नदीपात्र झाले कचरामुक्‍त!

“प्रभात’ प्रभाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई
पिंपरी – सांगवी फाटा येथील श्रीमंत महादजी शिंदे पुलाशेजारील नैसर्गिक मुळा नदीपात्र प्लॅस्टिकयुक्त कचरा, भंगार व टाकाऊ वस्तूंपासून अबाधीत ठेवून नदीपात्रास मोकळा श्‍वास घेऊ द्यावा, या संदर्भात दैनिक “प्रभात’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदरील बातमीची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित घेऊन मुळा नदीपात्रातील कचरा, टाकाऊ वस्तू, भंगार उचलून नदीपात्राची साफसफाई करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment