Thursday 7 December 2017

प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींवर जनजागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी, दि.(प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने आयकर कायद्यातील तरतुदी व कार्यपध्दती संदर्भात जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने पालिकेच्या सर्व आहरण वितरण अधिकारी आणि आयकर विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडच्या ऑटोक्‍लस्टरमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यशाळेस मुख्य लेखापाल राजेश लांडे, प्राप्तीकर विभागाचे उपायुक्त डॉ. आदित्य साओले, प्राप्तीकर निरीक्षक अरफळे, ऍड शीतल लोहाडे, प्राप्तीकर सल्लागार दिलीप दिक्षीत, लेखाधिकारी प्रशांत झंनकर, रमेश जोशी, उपलेखापाल सुधिर शिंदे यांच्यासह महापालिकेचे लेखाधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment