Tuesday 26 December 2017

मोकाट कुत्र्यांमुळे चालक हैराण

पिंपरी – मोशी, चिखली, डुडूळगाव परिसरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.
मोशी येथून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे मोकाट कुत्रे धावत जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे. हीच स्थिती देहू-आळंदी रस्त्यावर देखील आहे. रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या हल्ल्यामध्ये नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्याही तक्रारी आहेत.

No comments:

Post a Comment