Thursday 14 December 2017

“कनेक्‍टिव्हिटी’च्या मर्यादांचे “सीमा’उल्लंघन!

– रस्ते विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मान्यता 
– सत्ताधाऱ्यांकडून समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य
पिंपरी – गेल्या 20 वर्षांपासून वंचित असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांना अखेर न्याय मिळाला. मुख्य शहर आणि समाविष्ट भाग यातील “कनेटिव्हटी’मध्ये सक्षम रस्त्यांअभावी मर्यादा येत होती. मात्र, सत्ताधारी स्थायी समितीने बुधवारी समाविष्ट गावातील रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. तसेच, शहरातील अन्य भागांत सुमारे 75 रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सभापती सीमा सावळे यांच्या कार्यकाळात समाविष्ट गावांच्या “कनेक्‍टिव्हिटी’तील मर्यादांचे “सीमा’उल्लंघन करण्यात सत्ताधारी भाजपा नेते यशस्वी झाले आहेत.

No comments:

Post a Comment