Wednesday 17 January 2018

भटक्‍या कुत्र्यांसमोर प्रशासन हतबल

  • नागरीक त्रस्त ः थेरगाव वाकड परिसरात चार महिन्यांपासून कुत्र्यांचा त्रास
वाकड, (वार्ताहर) – मागील चार महिन्यांपासून थेरगाव, दत्तनगर, वाकड, डांगे चौक परिसरात भटक्‍या कुत्र्यांच्या हैदोस सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी या परिसरात बाहेरुन भटकी कुत्री आणून सोडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. तेव्हा प्रशासनाने ही कुत्री पकडण्यात येतील व जर कोणी आणून सोडली असतील तर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु चार महिन्यांमध्ये प्रशासनाला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. प्रशासनाच्या हतबलतेने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे. पूर्वी केवळ रात्रीच त्रास देणारी ही कुत्री आता दिवसा देखील परिसरामध्ये दहशत पसरवू लागली आहेत.

No comments:

Post a Comment