Friday 27 April 2018

मोहननगरचा तलाव 10 महिन्यांपासून बंद

तलावायन भाग – 8
पिंपरी – मोहननगर येथील राजर्षी शाहु महाराज जलतरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल 10 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. हा तलाव ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळेच बंद असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मात्र 10 महिन्यांपासून बंद ठेवूनही तलावाच्या दुरुस्तीची कामे ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे आजही पुर्ण झालेली नाहीत. अर्धवट राहिलेली कामे पुर्ण करुन लवकरात लवकर तलाव सुरु करावा अशी मागणी जलतरणप्रेमींनी केली आहे.

No comments:

Post a Comment