Friday 27 April 2018

मेट्रोच्या ९० टक्के जागा ताब्यात

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी आवश्‍यक असलेले जागेचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांसाठी 'महामेट्रो'ला अंदाजे ४० हेक्‍टर जागेची गरज होती. त्यापैकी ३६ हेक्‍टर जागा ताब्यात आली आहे. ही जागा सरकारी मालकीची असून उर्वरित चार हेक्‍टर जागा खासगी मालकांची आहे. त्यातील काही जागांच्या मालकांनी जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती 'महामेट्रो'चे अधिकारी प्रकाश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वनाज ते धान्यगोदाम (रिच २) या मार्गाचे प्रकल्प व्यस्थापक गौतम बिऱ्हाडे या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment