Thursday 12 April 2018

पिंपरी काळेवाडीतील भुमिपुत्रांनी तांबडया मातीचा वारसा जपला

पंचनाथ उत्सवातील कुस्तीच्या आखाडयात शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले
चौफेर न्यूज – महाराष्ट्र आजही आपल्या पराक्रमांची आणि संस्कृतीची गाथा सांगतो ती तांबड्या मातीतील कुस्तीमुळे. साडेतीनशे वर्षांपुर्वी शिवछत्रपतींच्या हाकेला ओ देताना हजारो पैलवान बाहेर पडले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. भगव्या झेंड्याचा धाक काश्मिर ते कन्याकुमारी, काबुल ते कंधारपर्यत बसवला. राजघराण्यातील मंडळीही कुस्त्या खेळत असत. छत्रपतीचे धाकटे बंधू चिमासाहेब महाराजही निष्णात कुस्तीगीर होते. तांबडया मातीतील कुस्तीला देशभर राजाश्रय मिळत होता. पवित्र इंद्रायणी आणि पवनेच्या कुशीत वसलेल्या परिसरात स्वातंत्र्य पुर्व काळात खडकी व देहूरोड येथे दारुगोळ्याचा कारखाना सुरु झाला. स्वातंत्र्यानंतर 1952 साली पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पिंपरी मध्ये एचए कंपनीचे भूमीपुजन केले. यानंतर या पंचक्रोशीची औद्योगिकीकरणाकडे वाटचाल सुरु झाली. उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि खासदार आण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड शहरात एमआयडीसीचा विस्तार झाला. देशभरातून रोजीरोटीसाठी आलेल्या कष्टक-यांमुळे पिंपरी चिंचवड नगरीने आंतरराष्ट्रीय पातळीने अनेक क्षेत्रात नाव कमविले. पाच गावांचे शहर ते मेट्रोसिटी आणि स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु असणा-या पिंपरी काळेवाडीतील भूमिपुत्रांनी 21 व्या शतकातही तांबडया मातीचा वारसा जपत भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले.

No comments:

Post a Comment