Thursday 12 April 2018

पक्षी आणि प्राण्यांसाठी तयार केली पाणपोई

जुनी सांगवी - उन्हाळ्यात अन्न पाण्यावाचुन भटकी जनावरे, पक्षी यांचे हाल होतात. त्यामुळे असे पक्षी, प्राणी अन्नपाण्याच्या शोधात परिसर सोडुन स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे परिसरातील चिवचिवाट उन्हाळ्यात कमी होवुन परिसरात एक उजाड शांतता पसरते. परंतु, शहरात सिमेंटची जंगले, वृक्षांचा अभाव, दाट लोकवस्तीमुळे एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. माणसांसाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पहातो. मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवुन त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने खआस प्राण्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे. या पाणपोईत दुस-याच दिवशी रस्त्यावरून जाणा-या प्राण्यांनी आपली तहान भागवली.

No comments:

Post a Comment