Wednesday, 2 May 2018

कंत्राटी कामगारांचे शोषण; ठेकेदार गब्बर

औद्योगिकनगरीत सुमारे पावणे दोन लाख कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना शासनाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. मालक आणि कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक केली जात आहे. याविरोधात आवाज उठविल्यास त्यांना कामावरून काढले जात आहे. त्यामुळे शहरातील कंत्राटी कामगार वार्‍यावर  आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख कामगार आहेत. यामध्ये पावणे दोन लाख कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. पूर्वी कायमस्वरूपी कामगार निवृत्‍त झाल्यावर त्यांच्या वारसाला कामावर घेतले जात असे; मात्र सध्या कंत्राटी कामगारांची भरती करून त्यांची पिळवणूक केली जात आहे. कंत्राटदाराकडून कामगारांचा इएसआय, भविष्यनिर्वाह निधींची काही रक्‍कम कापून घेतली जाते. ती संबंधीत विभागाकडे जमा करणे गरजेचे असते; मात्र कंत्राटदाराकडून ती रक्‍कम भरलीच जात नाही. याबाबत मालकाने कामगार आयुक्‍तांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र, मालकाकडूनही दखल न घेतली गेल्याने कंत्राटदारांवर कारवाई केली जात नाही. 

No comments:

Post a Comment