Wednesday, 2 May 2018

स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता

स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्प व योजनांवर चर्चा करून सल्ला व सूचना देण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस (स्थानिक सल्लागार समिती) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या फोरममध्ये शहरातील सर्व खासदार व आमदारांचा समावेश असणार आहे. स्मार्ट सिटीची बैठक सोमवारी (दि.30) झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा, या उद्देशाने शहर पातळीवर अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापन करण्यात येणार आहे. हा फोरम स्मार्ट सिटीतील नियमानुसार स्थापन केला जाणार आहे

No comments:

Post a Comment