Friday 11 May 2018

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातुन पवना धरणातून गाळ काढण्याची मोहिम सुरूच; २ वर्षात ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात गुरुवारी (१० मे) पवना धरण भागात केली. 

No comments:

Post a Comment