Thursday 28 June 2018

प्राध्यापकांना कमी करता येणार नाही

'एआयसीटीई'ची इंजिनीअरिंग कॉलेजांना ताकीद

इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment