Wednesday 27 June 2018

आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे काढता येणार पासपोर्ट

चौफेर न्यूज – पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. यासाठी पासपोर्ट सेवा अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली.

No comments:

Post a Comment