Tuesday 25 September 2018

प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

चिंचवड – भारतीय रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर दरम्यान स्वच्छता मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चिंचवड रेल्वे स्थानक व परिसराची स्वच्छता व स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी ही शपथ दिली. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सुचनेनुसार मध्य रेल्वेच्या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मध्य रेल्वे विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एस. के. दास, संजीव सोन्ना, चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख ए. एम. नायर, उपप्रमुख अमित कुमार आदी उपस्थित होते. प्रा. जस्मीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. तृप्ती बजाज, प्रा. अश्‍विनी तंटक, प्रा. समीता शिंदे, प्रा. प्रगती कलंबे, प्रा. नितू चव्हाण, ब्रिजेश देशमुख, प्रा. सुरेखा कुंभार, प्रा. मच्छिंद्र सोनावणे, प्रा. प्रज्ञा गुजराती, प्रा. सोनाली निकम, रेल्वे कर्मचारी मनोहर वडके, अनिल कदम आदींनी संयोजन केले.

No comments:

Post a Comment