Thursday 11 October 2018

राष्ट्रवादीत मतभेदाची ठिणगी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती व “स्मार्ट सिटी’ अंतर्गत महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दिल्ली दौरा उरकला आहे. मात्र, या दौऱ्यावर नगरसेवक मयूर कलाटे यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या या दौऱ्यात सहभाग असल्याने कलाटे यांच्या टीकेमुळे राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. याशिवाय स्थायी समितीमध्ये मंजुर झालेल्या 350 कोटींच्या कचरा उचलण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या स्थायी सदस्या गीता मंचरकर यांनीच विरोध केला अन्य दोन नगरसेवकांची चुप्पीमुळे वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment