Thursday 11 October 2018

डी.वाय.पाटीलमध्ये वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन

वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती होण्यासाठी
आकुर्डी : वन्यप्राण्यांबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन्यजीव सप्ताह हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विविध शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून वन्यजीव सप्ताहाचे साजरा होतो. डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात दि.1 ते 7 सप्टेंबर रोजी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहीती तसेच त्यांच्या संर्वधनाची जागृती निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाचे उद्घाटन भीमाशंकर येथील वन अधिकारी शिवाजी फंटागरे यांच्या हस्ते करण्यात आले. फटांगरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भारतातील वनांची माहीती दिली. त्याचप्रमाणे भारतातील अभयारण्ये तसेच राष्ट्रीय उद्याने, त्यामध्ये आढळणारे प्राणी-पक्षी यांचे पी.पी.टी.द्वारे सादरीकरण देखील केले. विद्यार्थ्यांना माहिती नसलेल्या पक्षांची देखील यावेळी फोटोच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.

No comments:

Post a Comment