Wednesday 6 May 2020

पाच लाखांहून अधिक मजूरांमध्ये अस्वस्थता

पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर हे मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. या शहरात संपूर्ण भारतातून कामासाठी आलेले लाखो मजूर आहेत. या मजूरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली असून सुमारे पाच लाखांहून अधिक मजूरांना नेमकी माहिती आणि परवाने उपलब्ध होत नसल्यामुळे या मजूरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर पोलीस स्टेशन, रुग्णालयांच्या समोर या कामगारांची गर्दी वाढल्यामुळे शहरवासियांवरील धोकाही वाढू लागला आहे. तसेच संकटकाळात मजूर, कामगार हे शहर सोडून जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

No comments:

Post a Comment