Monday 10 December 2012

फळ, भाजीपाल्याचे भाव उतरले

फळ, भाजीपाल्याचे भाव उतरले: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
मंदावलेली आवक पुन्हा वेगात सुरू झाल्याने मंडईत मोठय़ा प्रमाणात फळ व भाजीपाल्याचा माल आला आहे. त्यामुळे मंडई ताज्या व स्वच्छ फळ व भाजीपाल्याने पुन्हा भरली आहे. आवक वाढल्याने २0 ते ३0 टक्क्यांनी भाव घसरले.

आडत्यांच्या बंदमुळे शेती मालाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे भाव वाढले होते. बंद मिटल्यानंतर पुन्हा पूर्ववत आवक सुरू झाली आहे. मटार, काकडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, रताळी, तसेच मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक, मूळा, कांदापाला आदीची मोठी आवक झाली. गाजर व आवळा दाखल झाला आहे. मटारचे भाव ५0 ते ६0 वरून ३0 ते ३५ रुपये किलो झाले. कांदा २0, बटाटा १६ ते २0, टोमॅटो ७ ते १0, वांगी २0, गाजर २५ ते ३0, काकडी २५ ते ३0, बीट २0 रुपये असा किलोचा दर होता.

बोरांची आवक
मंडईत बोराची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. चांगल्या दर्जाची बोरे ८0 रुपये व छोटी बोरे ३0 ते ४0 रुपये किलो होती. सीताफळाचा ४0 ते ८0 रुपये किलो भाव होता. चिकू ६0 ते ८0, डाळिंब ८0 ते १२0, संत्री ६0 ते ८0, मोसंबी ४0 ते ६0, पपई ४0, कलिंगड ३0 रुपये किलो दर होता.

No comments:

Post a Comment