Sunday 11 August 2013

ऑक्टोबरपासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

पुणे : राज्यातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांना 
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट 
बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून ऑक्टोबर पासून 
त्या बसविण्याच्या कामास 
सुरूवात होईल. हायसिक्युरिटी नंबरप्लेटमुळे वाहन चोरीला मोठयाप्रमाणात आळा बसू शकेल अशी माहिती परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शर्मा यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला, उपप्रादेशिक 
अधिकारी अजित शिंदे, अनिल वळीव, अमर पाटील, जितेंद्र पाठक 
उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा प्रस्ताव आला होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो मागे पडला. पुन्हा त्याची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याठीची निविदा काढण्यात आली आहे. 
साधारणत: ऑक्टोबरपासून त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. पहिल्यांदा नवीन वाहनांना त्या बसविल्या जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या जुन्या वाहनांना बसविले जातील असे शैलेश शर्मा यांनी सांगितले. 
हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविल्यामुळे वाहन चोरीच्या घटनांवर चाप बसू शकेल. आरटीओने एकदा बसवून दिलेली नंबरप्लेट बदलता येणार नाही. ऑल इंडिया परमीट घेतल्यानंतर टॅक्सी, कॅबचालकांनी मीटर बसवून शहरांतर्गत वाहतूक करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सुचना शर्मा यांनी यावेळी आरटीओच्या अधिकार्‍यांना दिल्या. तसेच पुणे विभागातील महसुलवाढीचा आढावा त्यांनी घेतला. (प्रतिनिधी)

अशी असेल हाय सिक्युरिटी नंबरप्लेट 
हाय सिक्युरिटी नंबप्लेटमध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर बसविण्यात येणार आहेत. एकदा वाहनाला नंबरप्लेट बसविल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाहीत. नंबरप्लेटला लॉक जोडलेला असेल. तो लॉक तोडण्याचा प्रयत्न केला गेल्यास संबंधित वाहनचालकावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. चारचाकी वाहनांना ३५0 रूपयांमध्ये तर दुचाकी वाहनांना १00 रूपयांमध्ये ही नंबरप्लेट बसवून दिली जाणार आहे.

No comments:

Post a Comment