Sunday 11 August 2013

हॉटेल, बिअरशॉपींवर पोलिसांची कारवाई

पिंपरी : निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असणारे हॉटेल, बिअरशॉपी यांवर पोलिसांनी पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहानंतर पिंपरीतील १0 आणि हिंजवडीतील ७ आस्थापनांवर कारवाई करून गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी शनिवारी दिली. 
शहरातील प्रत्येक हॉटेल, बिअरशॉपी, वाईनशॉपी किती वेळेपर्यंत उघड्या ठेवाव्यात याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तरीही अनेक भागांमध्ये निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल्स, बिअरबार, वाईनशॉप सुरू राहतात, अशा तक्रारी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार असे हॉटेल्स आणि दुकानांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असे प्रकार बंद व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक अन्य पोलीस ठाण्याचे पथक पाठविण्याची क्लृप्ती लढविण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल मालाश्री, हॉटेल सलोनी, हॉटेल दक्षिण, 
हॉटेल व्हिलेज, रेणू बिअरशॉपी, 
विकी वाईन, ब्लू ९ वाईनशॉपीवर कारवाई करण्यात आली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांदळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
हिंजवडीतल्या कस्पटेवस्तीतील रेगीस हॉटेल, काळेवाडी फाटा 
येथील कुणाल हॉटेल, थेरगावातील सोना वाईन, डांगे चौकातील 
रसगंधा हॉटेल, ताथवडेतील हॉटेल सागर कॅफे, पुनावळेतील हॉटेल गोकुळ, कस्पटे वस्ती येथील 
हॉटेल बावर्चीवर कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment