Sunday 11 August 2013

वाहतूक नियोजन कक्ष नामधारी

पिंपरी : महापालिकेत वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गरज लक्षात घेऊन मागील महिन्यात स्वतंत्र कक्ष स्थापन झाला असला तरी अद्याप कार्यान्वीत होऊ शकला नाही. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचे काम या कक्षातर्फे होईल, अशी घोषणा केली. परंतु त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असून हा कक्ष नामधारी ठरू लागला आहे.
सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली या कक्षाचे कामकाज सुरू झाले आहे. त्यासाठी १ कार्यकारी अभियंता, १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता तसेच १ लिपिक आणि १ शिपाई असा कर्मचारी वर्ग वाहतूक नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून दिला आहे. 
शहराचे दळणवळण आणि वाहतूक यासाठी जे प्रकल्प राबवले जातात. त्या प्रकल्पांची उभारणी, देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेत अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहे. पण वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष नव्हता. ही बाब लक्षात 
घेऊन महापालिकेत स्वतंत्र वाहतूक नियोजन कक्ष स्थापन करण्यात 
आला आहे. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. परंतु महापालिका आवारातसुद्धा वाहन व्यवस्थेचे योग्य प्रकारे नियोजन होत नाही. अन्य ठिकाणी महापालिकेचा हा कक्ष कसे नियोजन करणार, असा प्रश्न उपस्थित केला 
जात आहे. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment