Wednesday 2 April 2014

पिंपरी-चिंचवडला गुरुवारी सायंकाळी बंद

जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 4) सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरुपाने होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने कळविले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पंपींगचे तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी यमुनानगर, निगडी सेक्टर क्रमांक 22, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवडस्टेशन, इंदिरानगर, अजमेरा, मोरवाडी, नेहरुनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, कासारवाडी, फुगेवाडी, खराळवाडी, कुंदननगर आदी भागाला सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

No comments:

Post a Comment