Monday, 16 May 2016

[Video] लोकसभेत, विधानसभेत चुकीचे बटन दाबलेत, मात्र महापालिका निवडणुकीत योग्य बटण दाबा - अजित पवार

ज्या सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करु सांगितले. मात्र त्यांच्या या आश्वासानाला न्यायालयानेच स्थगिती दिली, तिच गत दुष्काळाची दुष्काळ जाहीर कारा म्हणून आमचा घसा कोरडा झाला. मात्र यांनी पावसाळ्याच्या तोंडावर दुष्काळ जाहीर केला, त्यामुळे नागरिकांनी आता तरी विचार करावा व लोकसभा विधानसभेमध्ये जे चुकीचे बटण दाबले ते न दाबता महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या समोरचेच बटण दाबावे, असा राष्ट्रवादीचा एक प्रकारे जाहीर प्रचारच अजित पवारांनी यांनी केला आहे. चिंचवड येथील संभाजीनगरमधील साई आंब्रेला बाह्य रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, नगरसेवक नारायण बहिरवाडे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे आदी उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment