Thursday 25 May 2017

सर्वपक्षीयांचा बोपखेलकरांना पाठिंबा

– रस्त्यासाठी उपोषण : आंदोलनाचा चौथा दिवस 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – हक्काच्या रस्त्यासाठी बोपखेलकरांनी सुरु केलेल्या उपोषणला महापौर नितीन काळजे,खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, रिपाइंचे बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अजीज शेख, कामगार आघाडीचे विनोद चांदमारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारी (दि.24) आंदोलनकर्त्यांची भेट घेत, रस्त्यासारख्या मुलभूत प्रश्‍नासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचा विश्‍वास या सर्वांनी दिला.

No comments:

Post a Comment