Thursday 15 June 2017

वीज ग्राहकांवर ‘सिक्‍युरिटी डिपॉझिट’ चा ‘जिझिया कर’

महावितरणचा मनमानी कारभार : आर्थिक ‘भार’ कमी करण्यासाठी अभिनव फंडा 
* गेल्या काही दिवसांत ग्राहकांना दुप्पट वीजबीले 
* पठाणी वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी 
प्रभात विशेष
पुणे, दि. 14 (विशेष प्रतिनिधी) – गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत कर्जबाजारी झालेल्या महावितरण प्रशासनाने कर्जाचा हा डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्यासाठी महावितरण प्रशासनाने नेहमीप्रमाणे चक्क राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. कर्जाचा हा ” भार’ कमी करण्यासाठी प्रशासनाने राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांवर ” सिक्‍युरिटी डिपॉझिट’ च्या माध्यमातून ” जिझिया कर ‘ लावण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना या महिन्यात दुप्पट वीजबीले आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने पठाणी वसूली सुरू केली असून डिपॉझिटची ही रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करू, अशी धमकी देण्यास सुरुवात केली आहे. महावितरण प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या खर्चाने बेजार झालेले ग्राहक आणखीनच घायाळ झाले आहेत.

No comments:

Post a Comment