Thursday, 10 August 2017

सायन्स पार्क चिंचवड येथे 12 ऑगस्टला मेट्रो संवाद; जाणून घ्या मेट्रो प्रकल्पाबद्दल इत्यंभूत माहिती

आपल्या शहरात येणारी मेट्रो आहे तरी कशी? त्याचा मार्ग कसा व कुठून जाणार? मेट्रो स्टेशनची रचना कशी असेल? नाशिक फाटा, हॅरिस पूल येथून मेट्रो जाणार कशी? पादचारी, विकलांग नागरिकांसाठी काय सोयी असतील? मेट्रो प्रकल्पामुळे मार्गातील झाडे तुटणार आहेत का तसेच पर्यावरणाचा समतोल खरेच राखला जाणार आहे का? निगडी-दापोडी मार्गावरील चालू वाहतुकीला अडथळा निर्माण होईल का? ...तसेच पहिल्या फेजमध्ये निगडीपासून मेट्रो शक्य आहे का ह्या आपल्याला सतत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवा 'मेट्रो संवाद' कार्यक्रमात. सदर कार्यक्रम पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिनांक 12 ऑगस्ट, शनिवार सायंकाळी 5 वाजता, सायन्स पार्क, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment