Friday, 11 August 2017

शहर भाजपमध्ये दुफळी!

अमोल थोरात म्हणजे भाजप नव्हे : एकनाथ पवार यांचा टोला
पिंपरी – निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती चौकात उभारण्यात येणारा उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यापूर्वी त्याला पुणे महामेट्रो व्यवस्थापनाची परवानगी घेण्यात यावी, अशी सूचना भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यावर अमोल थोरात म्हणजे भाजप नव्हे; किंवा महापालिका नव्हे, असा उपरोधित टोला भाजपचेच सत्तारुढ पक्षनेत्यांनी लगावला आहे. यामुळे भाजपमधील गटबाजीचे दर्शन घडले आहे.

No comments:

Post a Comment