Friday 11 August 2017

[Video] नऊ वर्षांपासून पवना धरणाचे मजबुतीकरण रखडले


मजबुतीकरणास प्रकल्पग्रस्तांचा विरोध एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणा-या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. मावळ परिसरातील शेतक-यांच्या विरोध असल्यामुळे मजबुतीकरणाचे काम रखडले आहे. धरण मजबुतीकरणाचे काम झाल्यास 1.48 टीएमसी साठा क्षमता वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम 2004 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, 2008 मध्ये मावळातील शेतक-यांच्या आंदोलनानंतर ते काम थांबविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment