Wednesday 15 November 2017

मतदारांची नेमकी आकडेवारी समजणार

अचूक मतदारयादीसाठी बीएलओंकडून घरोघरी पडताळणी
पुणे – मतदार यादीमध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, दुबार, मयत आणि स्थलांतरीत यांची नावे मतदारयादीतून वगळून अधिक अचूक मतदार यादी तयार व्हावी ; यासाठी निवडणुक आयोगाने विशेष मोहिम आखली आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करणार आहेत. ही मोहिम येत्या गुरुवारपासून (दि.15) सुरू होणार आहे. या मोहिमेमुळे मतदारांची फुगलेली आकडेवारी कमी होण्यास तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment