Tuesday 27 February 2018

सात कोटी खर्च करून पिंपरी महापालिका बांधणार अपंग केंद्र

अमरवाणी न्यूज,२६ फेब्रुवारी : महापालिका अपंगांसाठी पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानंतर महापालिकेने पिंपरी येथील सर्व्हे नंबर 31-1 ते 5 व 31-1 ब-2 सहा मधील जागेमध्ये नि:समर्थ अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. देव कन्स्ट्रक्शन यांनी आठ कोटी सहा लाख रुपयांची निविदा भरली आहे. या ठेकेदाराकडून 12.57 टक्के कमी दराने म्हणजेच सात कोटी पाच लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.28) होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

No comments:

Post a Comment