Tuesday 20 February 2018

मुंबई-पुणे दरम्यान धावणार जगातील पहिली हायपरलूप

चौफेर न्यूज – मुंबई ते पुणेदरम्यान जगातील पहिली हायपरलूप धावणार असून दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर तसे झाल्यास फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाईल. हे अंतर गाठण्यासाठी सध्या तीन तास लागतात. रविवारी मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वाक्षऱ्या झाल्या. पहिला हायपरलूप रूट सेंट्रल पुणे यास मेगा पोलिसासोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची कोनशिला रविवारी बसवण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास समांतर हा मार्ग होऊ शकतो.

No comments:

Post a Comment