Sunday 13 May 2018

ब्रेकडाउन ला कधी लागणार ब्रेक

पिंपरी- सध्या शहरातील सर्वांत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएल ला ब्रेकडाउन च्या आजाराने ग्रासले आहे. ब्रेकडाउन म्हणजे भर रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेस. कोणत्या ना कोणत्या बिघाडामुळे रस्त्यात बंद पडणाऱ्या बसमुळे पीएमपी, कर्मचारी आणि प्रवासी सर्वच वैतागले आहेत. ब्रेकडाउनचा मोठा परिणाम संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या कित्येक बस या अत्यंत जुन्या झालेल्या असून त्यांचे आयुष्यमान केव्हाच संपून गेले आहे. रामभरोसे धावणाऱ्या या बस कधीही आणि कुठेही बंद पडतात. अशा वेळी प्रवाशांची चिड-चिड सहन करत त्यांना पर्यायी व्यवस्था करुन देणे आणि बंद पडलेल्या बसला वर्कशॉपपर्यंत पोहचवताना वाहक आणि चालकांना त्रास सहन करावा लागतो.

No comments:

Post a Comment