Wednesday 6 June 2018

झाडांची वेदना मांडण्याचा प्रयत्न

अंघोळीची गोळी संस्था व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरात खिळेमुक्त झाडे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या 15 आठवड्यांत 10 पोती खिळे, तारा, पोस्टर्स साठले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कनेक्टींग एनजीओ पीसीएमसी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या खिळ्यांंचे व  इतर संकलित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मंगळवारी (दि.5) चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्रात हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment