Monday 18 June 2018

जखमेवर आता इलेक्‍ट्रॉनिक बॅंडेज?

बारीकसारीक जखमा झाल्या की आपण पटकन एक बॅंडएड लावतो. जखम मोठी असेल तर बॅंडेज करतो. आता त्यासाठी येत आहे इलेक्‍ट्रोनिक बॅंडेज. अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात चाललेल्या या प्रयोगात नॅनो आकाराच्या तारांची जाळी तलम पॉलिमरमध्ये बसवलेली आहे. जखमेवर अलगद बसणाऱ्याय या लवचिक इलेक्‍ट्रॉनिक बॅंडेजमधून आवश्‍यक ती औषधांची मात्रा आवश्‍यक त्या प्रमाणात सोडता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वापरून त्वचेला सूक्ष्म उत्तेजन देऊन जखम भरण्याच्या आणि त्वचा सांधून येण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवता येईल. पुढे जाऊन या बॅंडेजमध्ये नॅनोसेन्सर्स बसवून जखमेच्या स्थितीवर सतत लक्षदेखील ठेवता येईल. जखमेवर त्यांचा हलका थर दिला की तो त्वचेत सहज मिसळून जातो. अक्षरश: दोन मिनिटात हे बॅंडेज छापून होतं.

No comments:

Post a Comment