Friday 3 August 2018

लोखंडे कामगार सभागृह कामगारांसाठीच ठेवावे

पिंपरी : महापालिकेने कामगारांसाठी उभारलेले पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे कामगार सभागृह आरोग्य खात्यास न देता ते कामगारांसाठीच ठेवावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, या भवनात कामगारांसाठी वाचनालय असून त्यात विविध उपक्रम पार पडतात. महापालिकेला 30 ते 40 टक्के कर कामगारांकडून मिळतो. उर्वरित कर कामगारनगरीतील विविध उद्योगांमधून प्राप्त होतो. परंतू, महापालिकेने या भवनातील तळमजल्यातील गाळे वाहतूक पोलिस यंत्रणेच्या कार्यालयीन कामकाजासाठी देले आहे. शिवाय उर्वरित राहिलेले गाळे आरोग्य खात्याच्या कार्यालयास देण्याचे ठरवले आहे. मात्र तसे करू नये.

No comments:

Post a Comment