Thursday 2 August 2018

तिनही मतदार संघातील मतदारांची संख्या वाढली

मतदार जागृतीसाठी मिनी मॅरेथॉन
पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघांतील मतदारांची संख्या वाढली आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये 11 लाख 99 हजार 703 मतदार असून गेल्या दीड महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी झालेल्या मॅरेथॉनमुळे पाच हजार 182 नवमतदारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या 12 लाख चार हजार 885 झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजेच चार लाख 69 हजार 259 मतदार आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची प्रारूप यादी एक जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार तीनही विधानसभा क्षेत्रातील 11 लाख 99 हजार 703 मतदार होते. त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने विशेष मोहिमा राबविल्या. याशिवाय दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मतदार जागृती मॅरेथॉन घेण्यात आल्या. त्यामध्ये नवमतदारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत.

No comments:

Post a Comment