Thursday 2 August 2018

११ कोटी ५८ लाखाच्या विकासकामांना स्थायीची मान्यता

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत खाजगी क्षेत्रातून सार्वजनिक सायकल सुविधा ही संकल्पना पहिल्या टप्यामध्ये पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व  वाकड या रस्त्यावरील व एरीया बेस डेव्हलेपमेंट मधील सुमारे ४५ ठिकाणी राबविण्यास स्थायी समिती सभेत  मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ५८ लाख रुपयांच्या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

No comments:

Post a Comment