Sunday 10 February 2019

राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!

पिंपरी-चिंचवड : भाजपच्या बालेकिल्यात निर्धार परिवर्तनाच्या सभेला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद, सभेच्या निमित्ताने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली एकजूट, सभेच्या नियोजनात अनुभवी नेत्यांसह युवा कार्यकर्त्यांचा पुढाकर आणि नेत्यांची उत्साह निर्माण करणारी भाषणे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा ब्रिगेड मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याच्या इर्षेने कामाला लागली असून पक्षाकडून आगामी निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अनुभवी पदाधिकारी आणि युवकांचा समतोल साधून आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

No comments:

Post a Comment