Sunday 10 February 2019

रंगांची उधळण करणार्‍या फुलझाडांची घट

पिंपरी चिंचवड : वसंताची चाहुल लागताच निसर्ग रंगाची उधळण करण्यासाठी सज्ज होतो. अशीच अनेक शोभेची फुलझाडे पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी मोठ्या संख्येने  रस्त्याच्या कडेला, उद्यानात, टेकडी परिसरात बहरून दिसत होती. परंतु, वाढते शहरीकरण आणि पालिका उद्यान विभागाचे नेहमीचेच असणारे दुर्लक्ष अशा कारणांमुळे शहरातील शोभेच्या फुलझाडांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वेगाने घट होत आहे. याकडे उद्यानविभाग लक्ष देईल का? यावर मात्र प्रश्‍न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment