Thursday 23 April 2020

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांसाठी ‘व्हॉटस्अप चॅटबॉट’ची सुविधा सुरू

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेमार्फत Whatsapp मोबाईल क्रमांकाद्वारे Chatbot ची सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याद्वारे Covid-19 बाबत नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन होणार आहे. कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी,  Covid-19 चाचणी केव्हा करावी? अशा प्रकारची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आज गुरुवार दि. २३.०४.२०२० रोजी Covid-19 संदर्भातील अद्ययावत माहितीकरिता ‘Whatsapp द्वारे Chatbot’ ची सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. 

No comments:

Post a Comment