Tuesday 1 January 2013

‘थर्टी फस्र्ट’साठी शहरात अतिरिक्त कुमक

‘थर्टी फस्र्ट’साठी शहरात अतिरिक्त कुमक: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

नववर्ष स्वागताची शहरवासीयांकडून जय्यत तयारी सुरू असून, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. बंदोबस्तासाठी पुण्यातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून, ती १ जानेवारीपर्यंत तैनात असेल. शहरवासीयांना थर्टी फस्र्ट जल्लोषात साजरा करता यावा यासाठी हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी तरुणाई आतुरली आहे. मौजमज्जा करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. बेधुंद नागरिकांवर कारवाईसाठी पोलीस सज्ज आहेत.

शहरात प्रवेशासाठीच्या आठ मुख्य मार्गांवर नाकाबंदी केली जाणार आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांचा मोठा फौजफाटाच रस्त्यावर उतरणार आहे. ८ ठाण्यांतील १६ निरीक्षक, ४५ उपनिरीक्षक, ८00 कर्मचारी, बॉम्बशोध व नाशक पथक, शीघ्र कृतिदल व दंगल नियंत्रण काबू पथकाची एक तुकडी बंदोबस्तावर असणार आहे.

No comments:

Post a Comment