Saturday 9 February 2013

‘विज्ञानधिष्ठित समाजाची गरज’

‘विज्ञानधिष्ठित समाजाची गरज’: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून विज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती घडवून आणण्याची गरज आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात अन्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपण मागे आहोत, अशी खंत व्यक्त करून विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती हेच आपल्यापुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने महापालिकेने उभारलेल्या विज्ञान केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री चंद्रेशकुमारी कटोच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा झाला.

No comments:

Post a Comment