Saturday 9 February 2013

अध्यादेश आठवडाभरात

अध्यादेश आठवडाभरात: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीचा अध्यादेश या आठवडाभरात काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात पर्यावरणपूरक प्रशासकीय इमारत उभारली आहे. याचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्तच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार गजानन बाबर, महापौर मोहिनी लांडे, आमदार सर्वश्री विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment