Saturday 9 February 2013

शाब्दिक कोट्या अन् हास्यविनोद

शाब्दिक कोट्या अन् हास्यविनोद: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार असे साहेब, बाबा, दादा शहरात एकाच व्यासपीठावर आले. त्यांच्यातील शाब्दिक कोट्या आणि एकमेकांचे केलेले कौतुक हा चर्चेचा विषय होता. हास्य विनोदाने कार्यक्रमात बहार आणली.

पाच विकास प्रकल्पांचे उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. दादांनी बाबांविषयी शाब्दिक कौतुक केले. अजितने नियोजनबद्ध विकास केला आहे, असा उल्लेख बाबांनी केला. बाबा व दादांच्या कामाविषयी साहेबांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment