Friday 28 June 2013

‘इंपोर्टेड’ मशिनचे लोकल ‘असेंबल’

‘इंपोर्टेड’ मशिनचे लोकल ‘असेंबल’: पिंपरी : वायसीएम रुग्णालयासाठी परदेशी बनावटीचे एचबीओटी मशिन खरेदी करण्याची फाईल तयार झाली. प्रत्यक्षात इंपोर्टेड मशिन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच तयार झाल्याचे गौडबंगाल आयुक्तांनी उघड केले. आर एस कुमार आणि आशा शेंडगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मशिन खरेदीचे पोलखोल केले.

वायसीएम रुग्णालयाचे नवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांना एचबीओटी (हायपर बेरिक ऑक्सिजन थेरपी) मशिन खरेदी प्रकरण भोवले. नवृतीनंतरही त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या मशिन खरेदीबाबत कुमार आणि शेंडगे यांनी प्रश्न विचारले होते. परदेशी बनावटीच्या मशिनला पुण्यातील कंपनीची निविदा कशी? मशिन परदेशातून आणले तर त्याचे फॅब्रिकेशनचे काम पुण्यात हडपसर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कसे झाले? असे या मशिनखरेदीची पोलखोल करणारे प्रश्न उपस्िित झाले.

No comments:

Post a Comment