Sunday 16 March 2014

पर्यावरण जागृतीसाठी निगडीत सायकल फ़ेरी

पिंपरी-चिंचवड उद्योगजकता क्लबतर्फ़े पर्यावरण जागृतीसाठी रविवारी (दि. 16)  13 किलोमीटर अंतराची प्रेरणादायी सायकल  फ़ेरी काढण्यात येणार आहे.  या उपक्रमाचे उदघाटन पुणे सायकल प्रतिष्ठानचे संस्थापक जुगल राठी यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात होणार आहे.
ही सायकल फ़ेरी भक्ती-शक्ती चौकातून निघून बिजलीनगर चौक, चापेकर चौक, पिंपरी कँप, डॉ. आंबेडकर चौक पिंपरी, चिंचवड स्टेशन मार्गे परत भक्ती-शक्ती चौकात या फेरीचा समारोप होणार आहे. सर्वांना या सायकल फेरीमध्ये सहभाग घेता येईल. मात्र, त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे अशी माहिती उद्योगजकता क्लबचे अध्यक्ष विनय चंद्रात्रे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment