Sunday 16 March 2014

अनधिकृत फलकांविरुद्ध आयुक्तांचे कारवाईचे आदेश

स्टीकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौदर्यात बाधा येऊ नये म्हणून सातत्याने अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई करावी, अशी  सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. याबाबत लवकरच संबंधित अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आज (शनिवार) सकाळी आठवाजल्यापासून 'फ'  क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागाची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.  यमुनानगर येथून पाहणी दौ-याला प्रारंभ झाला. त्यानंतर साईनाथनगर, श्रमिकनगर परिसर, रुपीनगर, गणेशनगर, तळवडे, संभाजीनगर येथून उद्यमनगर या परिसराची आयुक्तांनी पाहाणी केली.

No comments:

Post a Comment