Sunday 20 August 2017

पाण्यासाठी “सर्जिकल स्ट्राईक’ करा

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : शहरवासियांना सम प्रमाणात पाणी द्या
पिंपरी – पवना धरण शंभर टक्के होवूनही पाण्याचे योग्य नियोजन नाही, अनेक भागात कमी दाबाने, पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. भविष्यात शहराची तहान भागविण्यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्प, आंद्रा, भामा-आसखेड पाणी योजनांना तातडीने राबविण्याची आवश्‍यकता आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी दबावाखाली व गोंधळलेल्या स्थितीत काम न करता, “सर्जिकल स्ट्राईक’ करावा, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर नितीन काळजे व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

No comments:

Post a Comment